Ad will apear here
Next
सर्वांत मोठे कृषि प्रदर्शन ‘किसान’चे पुण्यात उद्घाटन

पुणे : देशातील सर्वांत मोठे कृषी प्रदर्शन ‘किसान’चे पुण्यात बुधवारी, ११ डिसेंबर रोजी उद्घाटन झाले. दर वर्षीप्रमाणे या वर्षीदेखील प्रदर्शनाला भेट देणाऱ्या शेतकऱ्यांच्या पहिल्या गटाच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. 

११ ते १५ डिसेंबर २०१९ दरम्यान हे प्रदर्शन मोशी येथील पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व संमेलन केंद्रात भरविण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या पहिल्या गटात आंध्र प्रदेशमधून आलेले सी. एच. आर. प्रसाद, उस्मानाबादमधून आलेले बाळासाहेब भंडावले, जालन्याचे नारायण देशमुख आणि सुभाष बोराडे, नितीन बोराडे, पांडुरंग बोराडे, हणमंत बोराडे, बबन बोराडे, नारायण अप्पा बोराडे, कोल्हापूरचे अभिजित गंगाधरे, संभाजी पाटील, कुमार पवार, अशोक पाटील, प्रल्हाद पाटील, युवराज पाटील, भरत देवडकर, मेघराज पाटील, अण्णासो पाटील यांचा समावेश होता. 

१५ एकर क्षेत्रावर भरलेल्या या प्रदर्शनात देश-विदेशातील कंपन्या सहभागी झाल्या असून, ६०० हून अधिक कंपन्या, संशोधन संस्था, नवउद्योजक यांनी शेतीतील नवीन तंत्रज्ञान व उत्पादने सादर केली आहेत.

प्रदर्शनस्थळी जाण्यासाठी शिवाजीनगर येथील बँक ऑफ महाराष्ट्र, लोकमंगल बसस्टॉपपासून बसची मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.  
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/PZSPCH
Similar Posts
आंतरराष्ट्रीय विज्ञानपट महोत्सवात पुणेकर ‘कस्तुरी’च्या यशाचा दरवळ पुणे : दहावीत शिकणाऱ्या कस्तुरी कुलकर्णीने बनवलेल्या ‘सिंबायोसिस’ या लघुपटाला ‘इंटरनॅशनल सायन्स फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया’मध्ये तृतीय पुरस्कार मिळाला आहे. कस्तुरी ‘बेरीज वजाबाकी’ या मराठी चित्रपटाची सहाय्यक दिग्दर्शकसुद्धा आहे.
इला फाउंडेशनला आरबीएस अर्थ गार्डियन पुरस्कार पुणे : रॉयल बँक ऑफ स्कॉटलंड अर्थात आरबीएस इंडिया कंपनीच्या वतीने नुकतेच यंदाच्या आरबीएस अर्थ हिरो पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यामध्ये निसर्ग आणि पक्षी संवर्धन क्षेत्रासाठी दर्शवलेल्या बांधिलकीसाठी इला फाउंडेशनचा आरबीएस अर्थ गार्डियन पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
‘कृषी विज्ञान केंद्रांमध्ये गो-विज्ञान केंद्र स्थापन करणार’ पुणे : ‘देशातील कृषी विज्ञान केंद्रांमध्ये केंद्र शासनाच्या पुढाकारातून गो-कृषी विज्ञान केंद्रे स्थापन करण्यात येणार असून, गोशाळांना स्वावलंबी बनविण्यासाठी सर्वांच्या प्रयत्नांची गरज आहे,’ असे मत राष्ट्रीय कामधेनू आयोगाचे अध्यक्ष डॉ. वल्लभभाई कथिरिया यांनी पुण्यात व्यक्त केले.
किसान - देशातील सर्वांत मोठे कृषी प्रदर्शन यंदा ११ ते १५ डिसेंबरदरम्यान पुणे : किसान हे भारतातील सर्वांत मोठे कृषी प्रदर्शन ११ ते १५ डिसेंबर २०१९दरम्यान मोशी येथील पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व संमेलन केंद्रात आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे आयोजक निरंजन देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language